नाशिक शहरात अनेक भागात विजेचा लपंडाव

नाशिक (प्रतिनिधी) : वाढलेल्या विजेच्या बिलामुळे वैतागलेले ग्राहक आता विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेले आहेत. नाशिकमध्ये आज अनेक भागात वेगाच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागात लाईट गेली. परंतु आता पाऊस बंद झाला तरी विजेचा लपंडाव मात्र सुरूच आहे.

नेहमीच पाऊस सुरु झाला की लगेच लाईट सुद्धा जाते. आधीच नाशिककर अव्वाच्या सव्वा वीजबिल आल्याने ग्राहक त्रस्त आहेत त्यात आता विजेच्या लपंडावामुळे ते अधिकच वैतागले आहेत.