नाशिक रोड परिसरात घरफोडीचा प्रकार उघडकीस

नाशिक (प्रतिनिधी) रविवार दि १२ जुलै रोजी नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड येथे अनिता सुनील पोरजे यांच्या गैरउपस्थितीत त्यांच्या घरातील, २५ गॅम असलेली ६५ हजार किंमतीची पोथ,७ हजार किंमतीची ३ गॅम सोन्याची अंगठी,आणि ३ कॅरट पुष्कराज ७ हजार रुपये इत्यादी, सुमारे ७९ लाख किमतीच्या सोन्या व पुष्कराज वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.

रविवार सायंकाळी अनिता पोरजे ह्या मैत्रिणीच्या घरी गेलेल्या असताना, तेथून परतल्यावर त्यांना घराचा दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले, घरात चोरी झाल्याचा संशय येताच,घरातील लोखंडी कपाट तपासले असता त्यांना, २५ गॅम असलेली ६५ हजार किंमतिची पोथ,७ हजार किंमतिची ३ गॅम सोन्याची अंगठी,आणि ३ कॅरट पुष्कराज ७ हजार रुपये इत्यादी, वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी उपनगर उपनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार विचू करत आहेत.

बोरकर नर्सिंग होमे येथे लाखोंची चोरी

रविवार दिनांक १२ जुलै रोजी, जेलरोड परिसरात बोरकर नर्सिंग होम येथे सुमारे ७ लाख रुपये इतकी रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार घडला, या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.

रविवारी बोरकर नर्सिंग होम येथे अज्ञाताने दवाखान्याचे शटर उचकटवुन आत प्रवेश केला आणि कुलदीप सिंग बोरकर यांच्या कन्सल्टिंग रूम मधील टेबलाच्या ड्रावर मधून सुमारे ७ लाख रुपये इतकी रोख रक्कम चोरी केली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.जे.एम.गांगुर्डे करत आहे