नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर विचित्र अपघात; दोन जण जखमी

नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर विचित्र अपघात; दोन जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावर गुरुवार (12 मे) रोजी एक विचित्र अपघात घडला आहे.

घोटी गावा जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या खाजगी बसला मागून धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

गाडीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींवर घोटीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, MP 41P 3330 ही खाजगी बस मुंबईच्या दिशेने जात होती. महामार्गावरील घोटी जवळ ही खाजगी बस उभी होती. अचानक पाठीमागून आलेला टँकर क्रमांक MH 12 QG 0096 ने खाजगी बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, टँकर चालकाचे पाय कॅबिनमध्ये अडकले होते. या चालकाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या अपघातात अजून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर बस मधील किरकोळ प्रवाशांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातामुळे नाशिक मुंबई महामार्गाची वाहतूक काही वेळ खोळंबली होती.