नाशिक: पिता- पुत्र जगदीश आणि प्रणव जाधव यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा…

नाशिक: जगदीश जाधव आणि प्रणव जाधव यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. १९ मे) रोजी पिता पुत्राचे मृतदेह आढळून आले होते.

पंचवटी भागातील सीता गुंफा भागातील जगदीश पुंडलिक जाधव आणि त्यांचा मुलगा प्रणव हे मृतावस्थेत घरात आढळून आले होते.

घटनास्थळी प्रणव हा मृतावस्थेत तर त्याचे वडील जगदीश जाधव हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते.

मात्र दोघांच्याही मृत्यूमागचं कारण स्पष्ट होत नव्हतं..

पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला…

गुरुवारी दि. १९ मे २०२२ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास रेवास्वामी सोसायटी, फ्लॅट नं. ७ येथे जगदीश पुंडलिक जाधव (वय: ४८) यांनी गळफास गेट आत्महत्या केली होती. तसेच त्यांचा मुलगा प्रणव (वय: १७ वर्षे) हा मृतावस्थेत आढळून आला होता. याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र नंतर दोघांचेही शवविच्छेदन केल्यानंतर जगदीश जाधव यांचा गळफासाने मृत्यू झाल्याचे व प्रणव याचा गळा आवळून खू’न झाल्याबाबत अहवाल प्राप्त झाला…

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जगदीश जाधव यांचा मुलगा प्रणव हा हट्टी स्वभाव, उलटून बोलणे, हात उगारणे, वाईट शिवीगाळ करणे याला जग्धीश जाधव कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी प्रणव याचा गळा आवळून त्याला ठा’र केले.. व स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली, असे निष्पन्न झाले…