😳 नाशिक: इन्होवा कारमध्ये सापडला सापडला ६० किलो गांजा !

😳 नाशिक: इन्होवा कारमध्ये सापडला सापडला ६० किलो गांजा !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात एका बेवारस पांढऱ्या रंगाच्या इनोवा कारमध्ये तब्बल 60 किलो गांजा आढळून आला आहे. गांजा व इनोवा कारसह पोलिसांनी सुमारे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.

याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात बेवारस गांजा आढळून आलेल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अमली पदार्थ कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रात्री गस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना पांढऱ्या रंगाची इनोवा कार ही लाइट सुरू असताना दिसून आली. यावेळी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गाडीची झडती घेतली असता त्यांना दोन गोण्यांमध्ये संशयास्पद वस्तू दिसून आल्या.

या गोण्यांची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला आहे. बाजार भावात या जप्त केलेल्या गांजाची लाखो रुपये किंमत आहे. हा गांजा नेमका कुठून आला आणि कुठे चालला होता याबाबत आता आडगाव पोलिस तपास करत असून गाडीचालक संशयित फरार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस गाडी येत असल्याच पाहूनच संशयिताने गाडी उभी करून पोबारा केल्याच बोलले जात आहे.