नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच गमे यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यामुळे नाशिकमध्ये वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग ही आता चिंतेची बाब ठरत आहे. गुरुवारी नाशिकमध्ये २०५ कोरोना रुग्ण आढळून आले होते तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.