नाशिकचे पहिले हृदयरोग तज्ञ काळाच्या पडद्याआड….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील पहिले हृदयरोग तज्ञ आणि नाशिकमधल्या विविध संस्थांचे आधारस्तंभ असेलेले डॉ.विनय ठकार यांचे अल्पशा आजाराने आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. विनय ठकार हे निसर्गप्रेमी आणि उत्कृष्ट छायाचित्रकार सुद्धा होते. नाशिकमध्ये पक्षिमित्र आणि वन्यजीवप्रेमी म्हणून सुद्धा ते परिचित होते. त्यासोबतच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले. तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त मंडळ सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.