नवीन नाशिकमध्ये खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोखे आंदोलन

नाशिक (प्रतिनिधी): नवीन नाशिक भागातील उत्तम नगर परिसरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकारी यांनी याविरोधात आंदोलन करत खड्यांभोवती रांगोळी कडगून काळे झेंडे दाखवत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा निषेध व्यक्त केला आहे.

प्रभाग 29 मधील बुद्ध विहार ते उत्तम नगर परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास शालेय विद्यार्थी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.

लोकप्रतिनिधी मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे..तर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत असल्याचा आरोप करत शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याची सुधारणा होत नाही यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुद्धविहार ते उत्तम नगर याठिकाणी लोकप्रतिनिधी आणि मनपा चा निषेध करीत रस्त्यांवर रांगोळी काढत व काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आलं. यावेळी लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली..