नगरसेवकांच्या सह्या न जुळल्याने एकच गोंधळ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निडणूक मागील आठवड्यात पार पडल्या. परंतु यासाठी अर्ज दिलेले उमेदवार, सूचक, व अनुमोदकांच्या सह्या ह्या जुळल्याचं नाही. यावर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यानंतर नगरसेवकांना सही आपलीच आहे. हे सांगण्यासाठी ऑनलाईन सहभागी होण्यास सांगितले तर त्यातील काहींनी वेगवेगळे कारण देऊन ऑनलाईन स्क्रीन वर येण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वच गोंधळ झाला. यंत्रणेला गृहीत धरणाऱ्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी चांगलेच खडसावले. आणि आता पुढील निवडणुकांसाठी सर्व नगरसेवकांचे वैध सह्यांचे नमुने आताच मागवून घेतले आहेत. नगरसचिव राजू कुटे यांनी नगरसेवकांच्या सह्यांची एक पुस्तिका तयार करून त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कायदेशीर कागदपत्रांवर असणाऱ्या सह्यांचे तीन तीन नमुने घेण्यात येणार आहेत. येत्या निवडणुकांमधील उमेदवारांच्या सह्या ह्या जुळल्या नाही तर त्यांचे अर्ज रद्द होण्याची भीती नाकारता येत नाही.