धक्कादायक: पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न

धक्कादायक: पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): दहा वर्षीय मुलीला तिच्याच वडिलांनी फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडली आहे.

दिंडोरी तालुक्यातील दहेरेवाडी येथील जंगलात नेऊन ह्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा देण्याचा प्रयन्त केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राम महादू धनगरे याला पहिल्या पत्नीने नाकारल्याने त्याने दुसरं लग्न केलंय.

दुसरं लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नीच्या मुलीवरून घरात वाद वाढत गेले. सावत्र आईला मुलगी नकोशी झाली होती. घरातील वाद वाढत असल्याने धनगरे याने मुलीला संपवण्याचा विचार केला. शुक्रवारी स्वतःच्या मुलीला शाळेतून घरी नेण्यासाठी निघाला. घरी जात असताना त्याने जवळच असलेल्या जंगलात तिला नेले. या जंगलात या मुलीला दोरीच्या सहाय्याने फासी देण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात मुलगी आणि बापात झटापटी झाली. याचा आवज जवळच असलेला गुराखी नारायण गांगुर्डे याला आला. आवाज येणाऱ्या दिशेने गांगुर्डे गेला असता त्याला झाडावर एक लहान मुलगी लटकलेली दिसली. गांगुर्डे यांनी ह्या मुलीला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता जन्म देणाऱ्या बापानेच मुलीला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याच समोर आलं आहे. आता पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकरोड: सेन्ट्रल जेल मध्ये दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न