धक्कादायक: नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या; ३ घरेही जाळली

धक्कादायक: नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या; ३ घरेही जाळली

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

इगतपुरीत ही थरार घटना पाहायला मिळाली. ही संतापजनक घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.

घर जाळून 20 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली.

अधरवड येथे 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळली. पहाटेच्या सुमाराला कातकरी वस्तीतील थराराने नागरिक भयभीत झाले होते.

इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील पहाटे तीन वाजण्याच्या  सुमारास महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. 20 वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे.

तसेच कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकण्यात आली. यामुळे इगतपुरी तालुक्यातील खळबळ माजली आहे. एका टोळक्याकडून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बारशिंगवे या भागातील हे टोळके असून तेही आदिवासी समाजाचे आहेत. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आला आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.