धक्कादायक : टेम्पोमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या….

नाशिक (प्रतिनिधी) : घरासमोर उभ्या असलेल्या टेम्पो मध्ये ४८ वर्षीय पुरुषाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र मोतीराम घुगे (रा. पंडित नगर, बी.एन.नाईक कॉलनी) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. यांनी घरासमोर उभ्या असलेल्या ४०७ टेम्पोच्या बॉडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी राजेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.