दिलासा; कोरोनामुक्तांचा आकडा १ लाखावर

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या रुग्णाला बरा होऊन आता बऱ्याच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. १४ डिसेंबरच्या अहवालानुसार जिल्ह्यात १ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. आता डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांचा जेवढा आकडा होता, जवळजवळ तेवढाच आकडा कोरोनामुक्त झालेल्यांचा आहे. यामुळे हे वृत्त नागरिकांसाठी दिलासादायक आहे. दरदिवशी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा दोन हजारांपेक्षा जास्त होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये ४६७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. २९ जुलैला बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त होती. त्यानंतर हा आकडा वाढतंच गेला.

आणि  ५ नोव्हेंबरला ९० हजारांचा टप्पा गाठला. कोरोना मुक्तांसोबत मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. ही चांगली बाब असली तरीही नागरिकांनी अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे.