त्रंबकेश्वरमध्ये उसाच्या मळ्याला शॉर्ट सर्किट मुळे आग ; MSEB च्या हलगर्जीपणाचा परिणाम

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील त्रंबकेश्वर परिसरात उसाच्या मळ्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीमध्ये तब्बल ६ एकर उसाच्या मळ्याचे नुकसान झाले आहे. एमएसईबी च्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.

वारंवार शॉर्ट सर्किट होत असूनही MSEB त्याकडे दुर्लक्ष करत असे. त्यामुळेच ही आग लागून हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याच्या उसाच्या शेताचं लाखोंचं नुकसान झालं असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आणि MSEB च्या कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.