गोदाघाट परिसरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक (प्रतिनिधी): स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा घाटावर सुरू असलेल्या काम मुळे मुठे गल्ली ते पाथरवट लेन या मार्गावरील आणि शनी चौक ते बंसिधर टॉवर सुपेकर लेन ते हनुमान चौक या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक किमान शंभर दिवस बंद करण्यात आली आहे. या मार्गावर पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिस यंत्रणा कडून करण्यात आले आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग- काळाराम मंदिर दरवाजा मालवीय चौक कार्तिकी स्वामी मंदिर हनुमान चौक बाजूकडील रस्त्यावर वळवण्यात आली आहे. तसेच काळाराम मंदिर उत्तर दरवाजा शनी चौक कार्तिकी स्वामी मंदिर हनुमान चौक तसेच मालवीय चौक सरदार चौक मार्गे काट्या मारुती चौक मार्गाने इतरत्र जातील.