जिल्हाधिकारी कार्यालयात विनामास्क आढळल्यास हजार रुपये दंडाची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयात विनामास्क आढळणारे अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना थेट हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शहरात दंडाची वसुली महापालिकेकडून करण्यात येत असताना मनपा हद्दीतील जिल्हाधिकारी कार्यालयात विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांच्या दंडाची वसुली मात्र सामान्य शाखेच्या तहसीलदारांकडून करण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संर्सगाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण भागात मास्क न वापरणाऱ्यांना एक हजार रुपये दंडाची आकारणी केली जात आहे. नाशिक शहरातील दंड वसुली महापालिकेकडून केली जात आहे. ग्रामीण भागात ही जबाबदारी तहसीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. शासकीय वसुलीचे पुस्तक देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, शासनाकडे भरणा करण्याची व्यवस्था करण्याचेही आदेश दिले आहेत.