चायनीज खाल्ल्याचे पैसे मागितले म्हणून बेदम मारहाण!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या चायनीजच्या गाड्यावर चायनीज खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून भावानेच मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय.

पोलीस ठाण्यात मयूर कांतीलाल कुवर (वय ३०, रा. अक्षरधाम सोसायटी, पेठफाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे भाऊ विकी बोधक, यश शिंदे, अमन गुप्ता, गणेश गुप्ता हे चौघे संशयित रात्री साडेनऊ वाजेच्या सुमरास मयूर यांच्या श्रद्धा लॉन्स समोरील चायनीजच्या गाड्यावर आले होते. चायनीज खाऊन झाल्यावर मयूर याने पैसे मागितले असता शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी यश शिंदे याने हातात असलेल्या लाकडी दांडक्याने मयूर यांच्या डोक्यात मारले. तसेच विकी बोधक याने लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये मयूर यांनी गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चौघा संशयीतांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.