घृणास्पद : झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात काल (दि.०८) सकाळी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कैलास बाबुराव शिंदे याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार पिडीत महिला ही जुने नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयातील सी विंगमध्ये कोरोनावर उपचार घेण्यासाठी दाखल झाली होती. ती सकाळच्या सुमारास बाथरूममध्ये असतांना सेंटर मधील संशयित आरोपी कैलास शिंदे हा नशेच्या अवस्थेत दरवाजा उघडून आत गेला आणि महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या धक्कादायक प्रकरणानंतर महिला हॉस्पिटल्समध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न निर्माण झालाय. या घटनेसंदर्भात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.