NC

गडावर कावडी, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना यावर्षी गडावर येण्यास मनाई : जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक (प्रतिनिधी): आपल्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात जरी असली तरी तिचा उद्रेक कधी होईल हे सांगता येणे कठीण आहे; त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलेले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे स्वरूप आणि प्रशासकीय नियोजन यांची माहिती दिली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सवात भरणारी सप्तश्रृंगी देवीची यात्रा या वर्षी विश्वस्त, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून रद्द करण्यात आली आहे. गडावर कावडी, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना यावर्षी गडावर येण्यास मनाई असल्याने त्यांनी येऊ नये; जर कोणी निघाले असतील तर जिथे असाल तिथून त्यांनी मागे फिरावे; आणि आपल्या गावी, घरी जाऊन देवकार्य करावे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

गडावरील स्थानिक नागरिकांना पासेस दिले जाणार आहे; मात्र पासेसचा कोणी गैरवापर करेल त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. स्थानिक तहसीलदार आणि पोलीस प्रमुख यांना घटना प्रमुख म्हणून नेमण्यात आलेले आहे, असे देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790