गंगापूर रोडवर स्कॉर्पिओची रिक्षाला जोरदार धडक; दोन प्रवासी जखमी

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. गंगापूर रोडवरील बारदान फाटा येथे ही घटना घडली.

रिक्षाचालक सचिन जाधव यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या रिक्षात प्रवासी घेऊन नाशिककडे येत असतांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने (क्र. MH 15, CF 7171) त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षामधील प्रवासी स्नेहा भाऊसाहेब हंडोरे (वय: ३८) आणि तुषार काशिनाथ जाधव (वय:३४) हे जखमी झाले. रिक्षाला धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटून स्कॉर्पिओ इंद्रा फार्मच्या वॉल कंपाउंडला जाऊन धडकली. या घटनेनंतर स्कॉर्पिओचालकाने पोलीस ठाण्यात खबर न देता घटनास्थळाहून पळून गेला.