खाजगी हॉस्पिटल्सने जादा आकारलेले २७ लाख रुपये केले परत ; महापालिकेचा दणका

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांकडून अतिरिक्त बिल आकारणीच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. अशा रुग्णालयांवर कारवाई केली आहे. याअंतर्गत शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून अतिरिक्त घेतलेले तब्बल २७ लाख रुपये रुग्णांना परत केल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..