कौतुकास्पद : नाशिकच्या आरटीओला मिळाले ISO मानांकन….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या आरटीओ कार्यालयाला ISO ९००१-२०१५ सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

आरटीओने राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत ISO हे मानांकन देण्यात आले. २००७ पासून वाहनचालक लायसेन्ससाठी १.० आणि वाहन नोंदणीसाठी १.० या केंद्र सरकारने साकारलेल्या संगणकप्रणालीचा ऑफलाईन वापर सुरु करण्यात आला. यामुळे कार्यालयातील डीजीटायझेशन आणि इतर विविध उपक्रमांमधून येणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध झाली. याच्या यशस्वी वापरानंतर शासनाने राज्यभरात या प्रणालीद्वारे परीक्षा घेण्यास सुरुवात केली.