कारमधून जात असतांना एमआयडीसी भागात भिंतीवर बसलेला दिसला बिबट्या…

नाशिक (प्रतिनिधी): गोंदे एमआयडीसी या भागात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याच समोर आलेय..त्यामुळे येथील स्थानिकांमध्ये मोठं भीतीच वातावरण पसरले असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. कारमधून शूट केलेला एक बिबट्याचा व्हिडीओ समोर येतोय, बघण्यासाठी इथे क्लिक करा..

इगतपूरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीमधील टि.के.ई.एस. या आस्थापनेजवळ बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. रात्रीच्या सुमारास एका भिंतीवर हा बिबट्या बसलेला दिसून आला. या परिसरात या बिबट्याचा मानवी वस्तीत जवळच वावर असल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी देखील नागरिक घाबरत आहेत. वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक करताय.

काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या ग्रामीण भागात लगत असलेल्या अनेक भागात नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. दोन दिवसांपूर्वी इगतपुरीच्या कानडवाडी इथल्या 3 वर्षीय बलिकेला बिबट्याने हल्ला करत घरातून  जंगलात ओढत नेले होते. या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बलिकेचा दुर्दैवाने उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये व हा बिबट्या तात्काळ जेरबंद व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..