कचराकुंडीत आढळले मृत अर्भक!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड परिसरातील कचराकुंडीत मृतावस्थेतील अर्भक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवळाली गावातील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नागरिकांना सुन्न करणारी ही घटना घडली आहे.

परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ शनिवारी (दि.०५) सकाळी 10 वाजेच्या सुमारास काही नागरिकांना पाच ते सहा महिन्यांचे मृत अवस्थेतील अर्भक आढळून आले. हा प्रकार पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून अज्ञात स्त्रीने अर्भकास जन्म दिला असून समाजातील बदनामीच्या भीतीने गुप्तपणे मृत अर्भकास टाकून दिले असावे असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला.