औद्योगिक घटकांचा ऑक्सिजन पुरवठ्याचा मार्ग मोकळा

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत वाढ होत होती. म्हणून मध्यंतरी कोरोनारुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन कमी पडतो.त्यामुळे औद्योगिक घटकांसाठी ऑक्सिजन पुरवठा शंभर टक्के बंद करण्यात आला होता. मात्र आता जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी (दि.१२ सप्टेंबर) रोजी कोरोनारुग्णांना औषधोपचारासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे.

म्हणून ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांनी उद्योगांना पुरवठा करणे बंद करावे असा आदेश मंजूर केला होता.म्हणून दरम्यानच्या काळात ऑक्‍सिजनच्या अभावामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात येत होती.तसेच निमा आणि आयमाच्या माध्यमातून देखील सातत्याने पाठपुरवठा  करण्यात येत होता.

लहान-मोठ्या अशा ११६ उद्योगांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध व्हावे म्हणून मागणी केली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी ऑक्सिजन उत्पादन कारखान्यांनी उत्पादन वाढवल्याने मागणी केलेल्या उद्योगांना  ८६६ सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात  जिल्हा उद्योग केंद्रात बैठक घेण्यात आली होती.