ऑनलाईन परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून घर सोडून गेला…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील उपनगर भागात राहणारा एक १४ वर्षीय मुलगा बेपत्ता आहे. भावेश ज्ञानेश्वर सूर्यवंशी असे त्याचे नाव आहे.  

भावेश्च्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि.०३) भावेशचा ऑनलाईन पेपर होता. त्या पेपरमध्ये भावेशला ४० गुणांपैकी ८ गुण मिळाले. त्याला कमी गुण मिळाले म्हणून त्याच्या आई आणि आजीने त्याला विचारले “तुला कमी मार्क कसेकाय पडले?” त्याने काही उत्तर दिले नाही. त्यानंतर दुपारी २.३० वाजेच्या सुमारास भावेश खेळण्यासाठी जातो असे सांगून बाहेर गेला. त्यानंतर बराच वेळ झाला. तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याचे कुणीतरी अपहरण केले आहे असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.