इमारती वरून पडून कामगार युवकाचा दुर्दैवी मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड मधील विहितगाव येथे साफसफाई करतांना चौथ्या मजल्याच्या टेरेस वरून पडुन १९ वर्षाच्या तरुण कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद उपनगर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.

हा तरुण दुपारच्या सुमारास आपल्या इमारतीच्या टेरेसवर साफसफाई करीत असताना ही घटना घडली. झाडूने झाडत असतांना अचानक पाय घसरल्याने तो खाली पडला. गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी त्याला जयरामभाई रुग्णालयात  दाखल केले. अधिक उपचारासाठी त्याला मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाचे नाव जितेंद्र सिंह असून अपर्णा हौ. सोसायटी. तलाठी कार्यालय विहितगाव येथील तो रहिवासी होता.