इन्स्टाग्रामवर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार.. नाशिकची घटना

नाशिक (प्रतिनिधी): इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन बालिकेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती केल्याची घटना सातपूर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार तसेच पोस्को कायद्यान्वये  गुन्हा संशयित तरुणास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली. यातील पिडीत बालिका १७ वर्षांची असून तिची सातपूरमधील सुनील गोदीराम ठाकरे (वय २७, रा. रुम क्र. १७, मातोश्री पार्क, सात माऊली मंदिराजवळ, श्रमिकनगर) या युवकाशी ओळख झाली. पिडीतेशी मैत्री वाढवून संशयिताने फेब्रुवारी महिन्यात तिला घरी बोलावून घेतले; आपण दोघे आता सोबतच रहाणार आहे, असे सांगत त्याने पिडीतेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पिडीता गर्भवती राहिल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली.

पिडीतेच्या तक्रारीन्वये सातपूर पोलिसांनी भादंवि कायदा कलम ३७६, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अर्थात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुनील ठाकरे यास मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. उपनिरीक्षक एस. व्ही. पाटील तपास करत आहेत.