आता नाशकात लागणार ‘स्मोक डीटेक्टर’

नाशिक (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१३-२०१४ या वर्षातील प्रदूषणमापनाच्या आधारे देशातील भविष्यात प्रदूषणकारी शहरांची यादी घोषित केली होती. त्यामध्ये नाशिकचाही समावेश होता. म्हणून महानगरपालिकेने शहरासाठी हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी आराखडा तयार केला आहे.

या आराखड्यात प्रदूषण नियंत्रणासाठी पारंपारिक उपाययोजनांचा तसेच स्मार्ट तंत्रज्ञानाचासुद्धा वापर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठीठीकानी ‘स्मोक डीटेक्टर’ बसवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कुणी कचरा जाळला किवा शेताचा कचरा, कडबा जाळल्याचा प्रकार महापालिकेच्या लवकर लक्षात येईल आणि संबंधितांवर कारवाई करता येईल.