आईला वाईट का बोलला विचारण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला…

नाशिक (प्रतिनिधी) : भांडीबाजारात आईला वाईट बोलल्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता त्याच्यावर संशयिताने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे.

चेतन विकास पवार (वय-२४, देशमुख वाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नळावर आलेल्या बाबू नावाच्या संशयिताने “तू माझ्या आईला शिवीगाळ का केली” असा जाब विचारायला गेला असता संशयित बाबू याने चेतन पवार यांच्यावर धारदार शास्त्राने वार केले. यामध्ये चेतन पवार गंभीर जखमी झाल्याने संशयितावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.