“अशी घरे तातडीने पाडण्यात यावीत” – महापौर सतीश कुलकर्णी

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपूर्वी भद्रकाली परीसरात वाडा पडून २ जण जखमी झाले होते आणि एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे असा प्रकार भविष्यात पुन्हा घडू नये, यासाठी महापौरांनी सूचना केल्या आहेत. त्यामुळे अशा गोष्टींना आळा बसावा यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्याबाबत नागरिक सातत्याने मागणी करत होते.

या घटनेनंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी या परिसराचा पाहणी दौरा केला होता. या भागात अनेक घरे धोकादायक असल्याचे चित्र त्यांना दिसून आले. त्यामुळे अशी जीर्ण झालेली घरे तातडीने पाडण्याच्या सूचना सतीश कुलकर्णी यांनी नगररचना विभागाला दिल्या आहेत.