अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; त्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी…

नाशिक (प्रतिनिधी) : आधी तोंड ओळखीतून मैत्री वाढवत अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवून अश्लील विडिओकॉल करण्यास सांगितले. ते रेकॉर्डिंग करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एका विरोधात बलात्कारासह त्याच्या तिघा साथीदारांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित नराधम हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोन्या (१८ रा, भालेराव मळा) याने पिडीतेकडून वेळोवेळी विविध कारणाने पैसे घेतले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला. त्याच प्रकारे इंस्टाग्रामवरून अश्लील विडिओ कॉल करायला लावून त्याची रेकॉर्डिंग केली. त्याचे साथीदार राहुल भाटिया उर्फ सनी (सुमित व अमित पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) य दोघानी देखील पीडितेस विडिओ कॉल करून धमकी दिल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे .