अखेर २२ लाखांची चोरी करणारी टोळी गजाआड!

नाशिक (प्रतिनिधी) : २२ जुलैला एका आंतरराज्यीय टोळक्याने भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील मेट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स प्रा.लि. या कंपनीचे गोडाऊन फोडून तब्बल २२ लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एलईडी टीव्ही, एसी आणि ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल एका ट्रकमध्ये टाकून ट्रक सह पळवून नेला होता. त्याप्रकरणात भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर तब्बल ८ दिवसांत पोलिसांनी या टोळीचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले आहे.

हा गुन्हा करणारे आरोपी हे गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा येथे असल्याची माहिती गुप्तहेराने दिली.  त्यांनतर नाशिक गुन्हे शाखेच्या सहा पोलिसांची टीम गुजरात साठी रवाना झाली. गुजरातच्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन गुन्हेगारांना अटक केली. अश्फाक अब्दुल्ला आणि याकूब चरखा अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.