अंजनेरी पर्वतावर होणारा प्रस्तावित रस्ता रद्द – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा !

नाशिक (प्रतिनिधी) : अंजनेरीचा रस्ता बांधल्याने येथील जैवविविधता धोक्यात येईल म्हणून हा रस्ता बांधण्याचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी नाशिककरांकडून आणि निसर्गप्रेमींकडून करण्यात येत होती. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांसह नाशिकचे लोकप्रतिनिधी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावूनही प्रस्ताव रद्द झालेला नाही. केवळ पर्यटनाच्या अट्टहासापोटी अंजनेरीच्या रस्त्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचे बोलले जात होते.

अखेर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अंजनेरी पर्वतावर होणारा रस्ता रद्द करण्यात आल्याचे ट्वीट करत सांगितले. आदित्य ठाकरे म्हणाले “अंजनेरी, नाशिक हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान आहे. पर्यावरणाला त्रास किंवा नाश होऊ नये आणि या ठिकाणची पवित्रता आणि शुद्धता बदलू देऊ नये असा आमचा मानस आहे. प्रस्तावित आणि चर्चा केलेला रस्ता होणार नाही.”