‘ब्रँडेड’च्या नावाखाली बनावट कपडे विक्री;कानडे मारुती लेनमधील दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): नामांकीत कंपनीच्या नावे बनावट कपडे विक्री प्रकरणी शहरातील कापड व्यावसायिकाविरोधात कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅल्वीन क्लेन कंपनीचे राकेश राम सावंत (रा. प्रभा देवी, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे.

किशोर खियलदास लालवाणी (रा. होलाराम कॉलनी, मायको सर्कल) असे बनावट कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे.

तीन महिन्यांपूर्वी शहरात मोबाइलचे बनावट साहित्य विक्री होत असल्याची बाब उघड झाल्यानंतर आता मुख्य बाजारपेठेतील ‘होलसेल’ दुकानात कंपन्यांच्या नावाने बनावट कपडे विक्री होत असल्याचे समोर येत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

‘ब्रँडेड’ असल्याचे सांगत कपड्यांचा साठा करून कंपनीचे नाव वापरल्याप्रकरणी हुंडिवाला लेनमधील दुकानात कारवाई करण्यात आली आहे. चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त करून भद्रकाली पोलिसांत व्यावसायिक किशोर खियलदास लालवाणी (रा. होलाराम कॉलनी) यांच्यावर ‘कॉपीराइट’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?:
भद्रकाली पोलिसांत राकेश राम सावंत (रा. सयाणीरोड, प्रभादेवी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. सावंत हे एका कपड्यांच्या कंपनीत ‘फिल्ड ऑफिसर’ आहेत. ‘कॉपीराइट’संदर्भात तपासणी करून कार्यवाही करताना नाशिकच्या मुख्य बाजारपेठेतील हुंडिवाला लेनमध्ये बनावट कपडे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सावंत यांनी कपड्यांची पाहणी केल्यावर गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना माहिती दिली.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

त्यान्वये, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी एक पथक सावंत यांसमवेत दुकानात पाठवले. तिथे पोलिस पथकाने तपासणी करून मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये चार हजार आठशे रुपयांच्या स्पोर्ट पॅन्टसहित तीन हजार सहाशे रुपयांच्या नाइट पॅन्ट आणि पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांच्या दुसऱ्या रंगातील नाइट पॅन्टचा समावेश आहे. मुद्देमालापैकी प्रत्येकी एक नग परीक्षणासाठी कंपनीकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक दीपक पटारे हे पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790