पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे

मुंबई (प्रतिनिधी): पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे तिकिट कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

रेल्वे क्रमांक : 04612, प्रस्थान स्थानक : श्री माता वैष्णो देवी कटरा, प्रस्थान वेळा : कटरा – रात्री 21:20, उधमपूर – रात्री 21:48, जम्मू – रात्री 23:00

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

ही विशेष रेल्वे अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यात आणि नवी दिल्लीकडे सुरक्षित व आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रामबन येथे राष्ट्रीय महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. काश्मीर व जम्मू येथे अडकलेले प्रवाशी या विशेष रेल्वेने प्रवास करु शकतात. ही रेल्वे सकाळी 09:30 वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

प्रशासन सर्व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here