Nashik Breaking: नविन कसारा घाटात भीषण अपघात; ५ ठार तर ४ गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मुंबई महामर्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंटजवळ रविवार ( ता. १८ रोजी ) दुपारच्या सुमारास दूध टँकरला अपघात झाला आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर थेट तीनशे फूट दरीत कोसळला आहे. या घटनेत ५ जण ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येतो आहे.

हायवे पोलीस आणि NHAI चे समीर चौधरी, सुरज आव्हाड, सचिन भडांगे, शिवा कातोरे देविदास म्हसणे, संदीप म्हसणे, आणि रुग्णवाहीका टीमने दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून ४ गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले. अजूनही तीन ते चार जण अडकले असल्याचा अंदाज आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी आणि कसारा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांची व जखमींची नावे लवकरच अपडेट करण्यात येतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790