🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिकमध्ये पुढील दोन दिवस उकाडा; तापमानात वाढीचा अंदाज

नाशिक, २२ एप्रिल २०२५ (प्रतिनिधी): नाशिक शहरासह राज्यातील काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.

सोमवारी सकाळपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली असून, कमाल तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ३८.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. परिणामी शहरातील उकाडा अधिक जाणवू लागला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

राज्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत असून, काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, नाशिकसह इतर भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची चिन्हे आहेत.

हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790