नाशिक (प्रतिनिधी): सलग काही दिवस ४० अंशांच्या उंबरठ्यावर स्थिरावलेले नाशिकचे तापमान अखेर कमी होऊ लागले असून, शहरवासीयांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. रविवारी (दि. २०) नोंदवले गेलेले कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान २०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळेस नागरिकांना उष्णतेचा त्रास कमी जाणवत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून नाशिकमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत होती. एप्रिलच्या पहिल्याच पंधरवड्यात कमाल तापमानाने ४१ अंशांचा टप्पा गाठल्याने शहरात उकाड्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले होते. त्यानंतर सलग अनेक दिवस उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवसांमध्ये तापमानात घसरण नोंदवली गेल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. उन्हाची तीव्रता थोडीशी कमी झाल्यामुळे वातावरण तुलनेने सौम्य वाटत आहे. हवामानातील हा बदल पुढील काही दिवस कायम राहतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790