नाशिकमधील आगामी कुंभमेळ्यासाठी बीएसएनएलची भूमिका महत्वाची- जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२६- २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) भूमिका महत्वाची आहे. त्यानुसार बीएसएनएलने या दोन्ही ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी बीएसएनएलने आतपासूनच कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बीएसएनएल युटिलिटीज/नेटवर्कचे नुकसान टाळणे, विविध सरकारी/खासगी एजन्सींच्या एक्स्कॅव्हेटरद्वारे सीबीयूडी अॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठी उपाययोजनांबाबत बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी‍ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक सारंग मांडवीकर, व्यवस्थापक ए.पी. गायकवाड, एस.एस. कुलकर्णी, एस.ए. भदाणे, एस.एन. मेधाने, व्ही. एस. गणोरे, ए.जी. चांगुणे उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: चैत्रोत्सवानिमित्त २५० लालपरी भाविकांच्या सेवेत

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, नेटवर्कची १०० टक्के उपलब्धता होण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व विभागांनी सीयूबीयूडी ॲपचा काटेकोरपणे वापर करावा. बीएसएनएलची सर्व क्षेत्रांशी आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि आपत्कालीन सेवा प्रदात्याशी संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका आहे. या पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. तसेच विक्रेते/उत्खनन करणाऱ्यांचे बिल पेमेंट सीबीयूडी वापराशी जोडले जावे. या अॅपची अंमलबजावणी न केल्यास देयकाचा काही भाग रोखावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात आज सकाळचा पाणीपुरवठा राहणार बंद

भदाणे यांनी पीपीटीद्वारे बीएसएनएल सेवा, सीएनटीएक्स-डब्ल्यू द्वारे प्रदान केलेल्या सेवा, सीएनटीएक्स-डब्ल्यू केबल्सचे नुकसान, ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत केबल बिघाड आणि एकूण सेवा बंद होण्याची आकडेवारी आणि नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर सादरीकरण केले.

741 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790