नाशिक: अग्निवीर तुकडी ०५/२४ चा शपथविधी व पासिंग आऊट परेड दिमाखात संपन्न !

नाशिक। दि. ०६ जून २०२५: अनेक महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर अग्निवीर तुकडी ०५/२४ चा शपथविधी आणि पासिंग आऊट परेड सोहळा तोफखाना केंद्र, नाशिक येथे मोठ्या शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या माध्यमातून या नवोदित सैनिकांचा भारतीय सैन्यात औपचारिक समावेश झाला. देशसेवेसाठी सज्ज झालेल्या या जवानांचा उत्साह, शिस्त आणि समर्पण भावनिक वातावरणात प्रेक्षकांच्या मनात ठसला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

ब्रिगेडियर आशीष भारद्वाज, कमांडंट, तोफखाना केंद्र, नाशिक यांनी परीक्षण अधिकारी म्हणून परेडची पाहणी केली. त्यांनी जवानांच्या चपळ व अचूक कवायतींचे कौतुक करत त्यांच्यात निर्माण झालेली शिस्त, आत्मविश्वास व देशभक्तीचे प्रदर्शन विशेषत्वाने गौरवले. प्रशिक्षण कालावधीत अग्निवीरांनी दाखवलेली मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या यशामागे मोलाचे ठरले, असेही त्यांनी नमूद केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

ब्रिगेडियर भारद्वाज यांनी जवानांना उद्देशून बोलताना, “देशाच्या सुरक्षेसाठी आपण आता सज्ज आहात. भारतीय सैन्यातील मूल्ये — शिस्त, निष्ठा आणि सेवा — यांची जपणूक करत आपण राष्ट्रासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन केले. यावेळी त्यांनी अग्निवीरांच्या पालकांना गौरव पदके देऊन त्यांचा सत्कार केला आणि मुलांना देशसेवेसाठी समर्पित केल्याबद्दल धन्यवाद दिले.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

या समारंभातून केवळ शपथविधी झाले नाही, तर देशाच्या संरक्षणासाठी नवे बळ तयार झाल्याची भावना उपस्थितांमध्ये उमटली. अग्निवीर तुकडी ०५/२४ चे हे जवान आता आपल्या कर्तव्याची सुरुवात करत असून, त्यांच्या शौर्याच्या नव्या अध्यायाची सुरुवातही या सोहळ्याने केली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here