Live Updates: Operation Sindoor

महत्वाची बातमी: नाशिक शहरांतील या भागांत शुक्रवारी (दि. १० जून) पाणीपुरवठा नाही…

महत्वाची बातमी: नाशिक शहरांतील या भागांत शुक्रवारी (दि. १० जून) पाणीपुरवठा नाही…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.

नाशिक शहरातील काही भागांत शुक्रवारी (दि. १० जून) पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील 30 लक्ष लिटर्स क्षमतेच्या जलकुंभाचे उर्ध्ववाहिनीवर जोडणीचे काम (cross connection) करणे आवश्यक आहे.

सदरचे काम शुक्रवार, दि. 10/06/2022 रोजी हाती घेण्यात येणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक परिमंडळात सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात १ हजार ४०२ नवीन वीजजोडण्या

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10891,10887,10877″]

सदर जलकुंभावरुन रामवाडी जलकुंभ भरणा होत असल्याने सदर जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.6 मधील रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्यानगर, बुरकुलेनगर, कोठारवाडी, रामनगर, बच्छाव हॉस्पीटल परिसर, कलाआई मंदिर परिसर, नागरे मळा, क्रांतीनगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनी काही भाग, मोरे मळा काही भाग, तुळजाभवानी नगर, रामकृष्णनगर, भावबंधन मंगल कार्यालयाजवळील काही भाग इत्यादी परिसरात तसेच,

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

प्र क्र. 5 मधील दत्तनगर, कुमावत नगर, शिंदेनगर, नवनाथनगर, द्रोणागिरी, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, जाणता राजा कॉलनी, भन्साळी मळा, रोहिणी नगर, नवरंग मंगल कार्यालय परिसर, पेठ नाका व मखमलाबाद नाका परिसर, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड व चिंचबन परिसर तसेच प्र क्र. 4 मधील पेठ रोड कॅनॉललगतचा परिसर, हरीओमनगर, पेठरोड वजनकाटा जवळील परिसर, फुलेनगर परिसर, विजय चौक, राहूलवाडी, भराडवाडी, लक्ष्मणनगर, वडारवाडी, पेठ रोडवरील शनी मंदिरासमोरील परिसर, दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकीजमागिल रामनगर परिसर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज सोसा ते युनियन बँक ते निमाणी पर्यंतचा परिसर, इत्यादी ठिकाणी शुक्रवार, दि. 10/06/2022 रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व शनिवार दि.11/06/2022 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790