नाशिक । ३० एप्रिल २०२४: महात्मानगर परिसरातील पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आला असून, त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ मधील तिडके कॉलनी परिसरातील स्त्री मंडळ जलकुंभ, लव्हाटे नगर जलकुंभ व महात्मा नगर जलकुंभ या टाक्या सातपूर विभागातील ६०० मि.मी. व्यासाची पाइपलाइनवरून शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्र येथून भरली जात असतात.
सद्यःस्थितीत या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून, पुरेशा प्रमाणात जलकुंभ भरले जात नाहीत. यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार जलशुद्धीकरण केंद्रावरून उपलब्ध पाण्याचे फेर नियोजन करण्यात आले आहे. कामगार नगर, पारिजात नगर, सुयोजित नगर येथील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात येत आहे. यापूर्वी महात्मा नगरला सकाळी ६ ते ८ व संध्या. ६ ते ८ अशा दोन टप्प्यात पाणी सोडण्यात येत होते. आता नवीन वेळापत्रकानुसार सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दोन टप्पे करून पाणी सोडण्यात येणार आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790