नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. २ ऑगस्ट २०२०) ४८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४९१ एकूण कोरोना रुग्ण:-१०२९६ एकूण मृत्यू:-२९५(आजचे मृत्यू १३) घरी सोडलेले रुग्ण :- ७५८६ उपचार घेत असलेले रुग्ण:- २४१५ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) शिवकृपा एच.पी. पंचवटी,नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) देवळाली, राजवाडा, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) उपनगर,नाशिक येथील ७१ वर्षी वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) नाशिकरोड, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) कमलनयन अपार्टमेंट, जुना आडगाव नाका येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६)जाधव संकुल, अंबड लिंक रोड, येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) हरी विहार सोसायटी, कृपाप्रसाद रोड, मुंबई नाका येथील ८४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) देवांग कॉम्प्लेक्स, इंदिरानगर येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) आरटीओ कॉर्नर,नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) हनुमान वाडी येथील ६९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११)साई श्री रो-हाउस, पाथर्डी फाटा येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेले आहे. १२) राज रिकी सोसायटी, नागजी हॉस्पिटलजवळ, वडाळा रोड येथील ६९ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे. १३) एकता नगर,नाशिकरोड येथील ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे.