नाशिक (प्रतिनिधी): तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे प्रदक्षिणेला जाण्याकरता भाविकांची मेळा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी रविवारी (दि. १८) दुपारी २ ते सोमवारी (दि. १९) रात्री ८ पर्यंत ठक्कर बसस्थानक ते तालुका पोलिस ठाणे या रोडवर वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे.
या मार्गावरील वाहनांकरीता पर्यायी मार्ग असा:
तालुका पोलिस ठाण्यापासून ठक्कर बसस्थानक येथून जाणारी वाहतूक सीबीएस सिग्नल, मोडक सिग्नलमार्गे इतरत्र जातील. या मार्गावर एस.टी. महामंडळाच्या बसव्यतिरिक्त इतर कुठल्याही खासगी वाहनांना प्रवेश बंद राहील.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790