नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी रोडवरील म्हसरूळ पोलिस चौकीसमोर एका खाजगी शाळेच्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाल्याची घटना बुधवार, (ता. २१) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही. मात्र, रस्त्यालगत उभी असलेली रिक्षा व दुचाकीला बसने धडक दिल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच पादचारी मार्गावर फुल, कटलरी साहित्य विकणाऱ्या दुकाने बस खाली आल्याने नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील एका खाजगी शाळेची बस दुपारी तीन ते पाऊने तीन च्या दरम्यान तीन ते चार बसेस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ होत होत्या. त्यावेळी एम एच १५ जी एन ४२९१ च्या चालकास अचानक फिट आली, परतू सदर चालकांचा वेग हा नियंत्रित होता.
मात्र, रस्त्यालगत उभी असलेली रिक्षास धक्का लागला. बस ही महालक्ष्मी बिल्डिंग समोरील बाजूस असलेल्या पादचारी मार्गावर चढवून दिली. यावेळी या ठिकाणी असलेल्या पथमार्गावर बसणाऱ्या विक्रेत्यांच्या चार ते पाच दुकानाजवळ जाऊन थांबली.
यात येथे उभी असलेली दुचाकी देखील या बस खाली आली. कडक उन्ह असल्याने सुदैवाने या ठिकाणी भाजीपाला, फुल, कटलरी साहित्य विकणारी मंडळी दुकानापासून दूर होती, यामुळे जिवीत हानी टळली.
या बसमध्ये खाजगी शाळेची लहान वयोगटातील जवळपास वीस ते बावीस विद्यार्थी होते. यांनाही कुठलीही दुखापत झाली नाही. या ठिकाणी लागलीच म्हसरूळ येथील ग्रामस्थ तसेच, आजूबाजूला रस्त्याहून मार्गक्रमण करणाऱ्या धाव घेतली बस मधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले अन् दुसऱ्या बसमध्ये मार्गस्थ केले.
आणि फिट आलेल्या बस चालकास बाजूला सावलीत बसवीत त्यावर प्राथमिक उपचार केले. अपघातानंतर येथे बघ्यांची गर्दी झाली होती.
हम्प बसवणार का?:
दिंडोरी रोड वाहनाची वर्दळ वाढली आहे. म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोड व म्हसरूळ पोलिस चौकी चौफुलीवर होणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी या दोन्हीं ठिकाणी हॅम्प बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आता तरी प्रशासन जाग होऊन तात्काळ हम्प बसवणार का?याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.