नाशिक। दि. २२ जून २०२५: बँक प्रतिनिधीकडून घरी जाऊन मोफत कर्ज देण्याचे आमिष देत मोबाइलमध्ये प्ले स्टोअरमधून अॅप डाऊनलोड करून आधार, पॅनकार्डआधारे बँकेतून १ लाख ५४ हजारांचे कर्ज काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी दोन एजंटविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि बापू इंगळे (रा. बालाजीनगर जेलरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रंगकाम व्यवसाय आहे. संशयित संतोष कांबळे, सुमित देवरे हे दोघे घरी आले. कुठेही चार्जेस न घेता फुकट कर्ज करून देण्याचे आमिष दिले. इंगळे यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी होकार दिला. संशयितांनी इंगळे यांच्या
मोबाइलमध्ये प्ले स्टोअरमधून ज्ञपेज आणि मॉनव्हेव दोन अॅप्स डाऊनलोड केले. इंगळे यांच्याकडून आधार, पॅनकार्ड घेऊन इंगळे यांच्या नावे ६० हजार आणि मोनव्हेव २० हजार असे ८० हजारांचे कर्ज काढले ही रक्कम इंगळे यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर संशयित कांबळे याने स्वतःच्या बँक खात्यात ४४ हजार ५०० रुपये वर्ग केले. दोघांनी संगनमत करत इंगळे यांचे कागदपत्र वापर करत कॉलेज रोड येथील एका मोबाइल दुकानातून ७४ हजारांचा मोबाइल कर्जावर खरेदी केला.
इंगळे यांच्या खात्यात ८ हजार वर्ग केले. इंगळे यांना बँकेकडून कर्जाचे हफ्ते थकल्याने विचारणा झाली. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. संशयितांशी संपर्क साधला असता एक महिन्यात कर्ज बंद करून देतो असे सांगत फसवणूक केली. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५७/२०२५)
![]()

