नाशिक। दि. २२ जून २०२५: गर्भवती विवाहितेला सासरच्या मंडळींनी क्रूर वागणूक देत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पाणी वाहून नेण्यास सांगत गर्भावस्थेत उपचाराचा खर्च आई-वडिलांकडून आणावा, अशी धमकी देत बेदम मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये पुणे येथे विवाह झाला. लग्नाच्या २० दिवसांनंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाइकांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पतीला सांगितले. पतीने मारहाण करत छळ केला. गर्भवती असताना सासूने इमारतीच्या खालून तिसऱ्या मजल्यावर पाणी भरण्यास सांगितले. दवाखान्याचा त्रास झाल्याने खर्च आई-वडिलांकडून घेऊन ये असे सांगून छळ केला.
दवाखान्यात जाण्याकरता उपचारांकरिता कागदपत्र दिले नाही. अनैतिक संबंधावरून कुरापत काढून पतीने बेदम मारहाण केली. मुलगा झाला तर नणंदेला द्यावा, अशी धमकी दिली. भीतीपोटी विवाहितेने वडिलांना सांगितले. पतीने पोटात लाथ मारत जखमी केले. माहेरी निघून आल्यानंतर फोनवरच शिवीगाळ करत परत न येण्याची धमकी दिली. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३१८/२०२५)