🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: दुचाकीचालकाची ट्रकचालकाला मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीचालकाने सरळ मार्गाने जाणाऱ्या ट्रकचालकाला मारहाण केल्याप्रकरणी संशयित दुचाकीचालकासह त्याच्या मित्राविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाखलगाव त्रिफुली येथे हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि ट्रकचालक विलास गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी २.३० वाजता ट्रक जीजे १५ एव्ही ४२२५ ने सरळ रस्त्याने जात असताना त्रिफुलीवर सायखेड्याकडून विरुद्ध दिशेने येणारी एमएच १५ एचएन ५५९२ वरील दोघांनी अरेरावी करत कुठून आला रे तू, आम्हाला उडवले असते ना असे म्हणाले. यावर ट्रकचालकाने त्यांना ‘तुम्हीच विरुद्ध दिशेने आलात’ असे म्हंटल्यानंतर दोघांनी ट्रकचालकाला लाकडी दांड्याने मारहाण केली. (आडगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२६/२०२५)

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790