नाशिक। दि. २२ जून २०२५: लग्नाचे आमिष देत युवतीचे आठ वर्षांपासून शोषण करत पलायन करणाऱ्या युवकाविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये संशयित मयूर आहिरे (रा. वडाळी नांदगाव, सध्या राहणार: ठाणे) हा कामानिमित्त शहरात आला. घराशेजारी भाडेकरारावर रहात असताना त्याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध ठेवले. नोकरी नसल्याने लग्न करता येणार नाही असे सांगून लग्न करण्यास टाळाटाळ केली. नोकरी लागल्यानंतर आणि स्वतःचे घर घेतल्यानंतर लग्न करू असे आश्वासन त्याच्यावर दिल्याने युवतीने विश्वास ठेवला.
संशयित भेटण्याचा बहाणा करत शहरातील हॉटेल, लॉज, घरी शारीरिक संबंध ठेवत होता. नोकरीसाठी बाहेर जातो असे सांगून गेला तो परत आला नाही. संशयिताशी संपर्क साधला मात्र संपर्क झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवतीने पोलिसांत तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहे. (म्हसरूळ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १६९)
![]()

